मणिपूरमधील अराजक आणि ‘संविधान सभे’च्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी दिलेला इशारा
सध्याच्या परिस्थितीत मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारामुळे देशातील लोक दु:खी असतील, तरच भारताला ‘एक राष्ट्र’ म्हणता येईल. मणिपूरमध्ये अन्याय, अत्याचार, जाळपोळ आणि बलात्कारामुळे देशाच्या इतर कोणत्याही भागात वा कोणत्याही समुदायाला आनंद होत असेल किंवा तेथील अराजकाला त्याची संमती असेल, तर भारताला ‘राष्ट्र’ म्हणता येणार नाही. सुख-दुःखाची वाटणी म्हणजेच ‘बंधुभाव’ हाच ‘राष्ट्रा’चा आधार असतो.......